रविंद्र भदर्गे, परतूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- भुयारी रेल्वे पुलासाठी मुख्य रस्त्याच्या पच्छिम बाजुचे अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेला सोमवारी सकाळ पासूनचं प्रशासनाने तयारी चालवली होती. त्यापुर्वी बहुतेकांनी आपल्या दुकानातील सामान हटविण्यास सुरुवात केल्याचे सोमवारी सकाळ पासून पाहायला मिळत होते.
सोमवारी अतिक्रमण काढण्याच्या तयारीने आलेल्या प्रशासना च्या ताफ्या सोबत व्यापारी वर्गाने परत चर्चा करुन एकुण ८० फुट रस्ता मोकळा करण्याऐवजी ७० फुटावर तडजोड झाल्याने दुपारी साडे अकरा वाजता अतिक्रमण काढायला प्रशासनाने सुरुवात केली.
दरम्यान व्यापारी वर्गाने प्रशासनाच्या अतिक्रमण मोहीमेला विरोध करत सोमवारी परतूर बंद चे केलेल्या आवाहनाला शहरात प्रतिसाद मिळाला नाही. व्यवसाईकांनी आपापल्या दुकानातील सामान काढण्यास सोमवारी सकाळपासून घाई केल्याचे दिसले. दुसरीकडे सकाळी दहा वाजता सुसज्ज पोलीस बळासह उपविभागीय पोलीस अधिकारी बुधवंत, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, आष्टी, मंठा सेवली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, तहसिलदार प्रतिभा गोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकामचे अभियंता वाघमारे, जेसीबी, पोकलेन सह आष्टी रेल्वे गेट चौकात हातोडा तरं नगरपालीकेचे मुख्याधिकारी अक्रिमणस्थळी उपस्थित व्यवसाईकांनी एकुण ६५ फुट जागेचा तोडगा पुन्हा एकदा तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यापुढे ठेवून चर्चा केली. शेवटी दुपारी साडेअकरा वाजता एकुण ७० फुट रस्ता मोकळा करण्यावर तडजोड होवून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आणि अखेर या अतिक्रमण वाद विवादावर कोणताही तणाव निर्माण झाला नाही.