विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन अहमदनगर:- संपूर्ण राज्याला खळबळ उडवून देणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव परिसरातून समोर आली आहे. येथे विहिरीत एकच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आला आहे. हे मृत्यदेह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
माळीबाभुळगाव येथील पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चौघांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळला आहे. पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सांगडे, मुलगी निषीधा सांगडे, संचिता सांगडे हे पोल्ट्रीफार्मवर राहत होते. धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला होता. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. रात्र झोपल्यानंतर पुन्हा नवरो बायकोत वाद झाल्याचे शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला होता. तेव्हा निषीधा सांगडे हीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीफार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. वीज पंपाच्या सहाय्याने पाणी उपसले तेव्हा कांचन सांगडे, निखील सांगडे, संचिता सांगडे या तिघांचे मृतदेह सापडले. कांचन आणि तिचे तिन्ही मुले विहिरीत मृत अवस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत.

