पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं 119/2023 भा.द.वि. कलम 307,323, 143, 144, 147, 148, 149 आर्म अॅक्ट 4 (25), म प अ कलम 37 (1) (3) 135, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 31()3(2)3( 4 ) या गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबूब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, वय 23 वर्ष, रा खुनिया बिल्डींग, चौथा मसला, कदम चाळ, संतोषनगर कात्रज, पुणे हा दिनांक 16/02/2023 रोजी पासून मिळून येत नव्हता. टोळी आरोपी सकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, वय 23 वर्ष, रा सुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चा प्रमुख संतोषनगर, कात्रज, पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधीत तो त्याचे अस्तीत्व लपवून वारंवार वेगवेगळया जिल्हयामध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाण बदलून वास्तव करीत होता त्याने त्यादरम्यान कात्रज आणि संतोषनगर परीसरात स्वताचे टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.
सदर आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अमल्दार यांनी वारंवार बाहेरील जिल्हयामध्ये गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रीय करून व तांत्रिक विश्लेषणावरुन शोध घेत असताना पोलीस अमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीय मेहबुव चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, हा मु.पो. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राहता आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी निरा, ता. पुरंदर, जि.पुणे येथे जावून आरोपी साकीव मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री नारायण शिरगावकर गो, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यचि ताब्यात देण्यात आले असून त्यांनी सदर आरोपीतास अटक केली आहे. आरोपी साकीच मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेवर यापूर्वी मोका कायदयांन्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयातून त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कानन भागात वर्चस्व प्रस्थापीत करण्याकरता त्यांच साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करुन त्याने सदरचा गुन्हा केला आहे. विशेषता आरोपी साकोन मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान
हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी काय भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करून त्यांचे टोळीची कात्रण भागात दहशत निर्माण करोत आहे.
सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, मा. नारायण शिरगावकर सगो, सा, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ फालीन निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसान्य, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी श्रोत्र, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

