रुपसेन उमराणी मुंबई ब्यूरो चीफ
नवी दिल्ली:- देशात दर वर्षी शेकडो करोड टोलच्या माध्यमातून सरकारला मिळत असते. पण रस्त्याची दुरवस्था काही कमी व्हायचं नाव नाही घेत. अनेक स्थिकाणी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य दिसून येत असते. त्यामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी पडतात व गंभीर जख्मी होतात. पण सरकार आणि कंपन्यांची टोल वसुली मात्र जोरात सुरू असते.
आता देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी आता नवीन हायटेक पद्धत टोल वसुली बाबत वापरली जाईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
नवीन टोल पद्धतीत कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवरील खोळंबा कायमचा संपेल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. येत्या काळात ही स्वयंचलित पद्धत नेमकी कितपत यशस्वी ठरते, हेही स्पष्ट होईल.
दरम्यान, देशातील सर्व टोलनाके नेमकी कधीपर्यंत बंद केले जाणार, हे कळू शकलेलं नाही. मात्र त्यासाठीच्या प्रयत्नांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. सध्या देशात फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली केली जाते. टोलनाक्यावर फास्टॅग नसलेल्लाय वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला होता. टोल नाक्यांवरील वाहनांची वाहतूक वेगाने व्हावी, यासाठी ही फास्टॅग प्रणाली आणण्यात आली होती. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोलनाके नेमके कसे काम करणार आहेत, हेही लवकरच स्पष्ट केलं जाईल.