Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोडा विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी ! तळेगाव दाभाडे येथिल ०२ सराईत गुन्हेगारांकडुन ०४ पिस्टल व १४ जिवंत काडतुसे जप्त…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 27, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दरोडा विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी ! तळेगाव दाभाडे येथिल ०२ सराईत गुन्हेगारांकडुन ०४ पिस्टल व १४ जिवंत काडतुसे जप्त…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या इसमांची बातमी प्राप्त करून त्यांचेविरुद्ध कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणा-या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांना दि. २५/०६/२०२३ रोजी “मावळ तालुक्यातील सराईत गुन्हेगार प्रमोद सांडमोर व शरद साळवी हे कोणतातरी गंभिर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे एस टी बस स्टैण्ड परिसरामध्ये येणार असुन त्यांनी त्यांचे कमरेस पिस्टल लावलेले आहे” अशी खात्रीशिर बातमी प्राप्त झाली.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस नाईक १४५८. आशिष बनकर, पोलीस नाईक १२३४ प्रविण कांबळे, पोलीस नाईक १७२२ गणेश कोकणे, पोलीस नाईक १०६२ गणेश हिंगे, पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर या पथकाने दि. २५/०६/२०२३ रोजी २०/१५ वा दरम्यान तळेगाव दाभाडे एस टी बस स्टैण्ड परिसरामध्ये सापळा लावला असताना सराईत आरोपी नामे १). प्रमोद सोपान सांडभोर वय ३३ वर्षे, रा तळेगाव स्टेशन जवळ, हरणेश्वर बाडी, बौध्द विहार जवळ, तळेगाव दाभाडे, पुणे २) शरद मुरलीधर साळवी, वय- ३० वर्षे रा धनगर बाबा मंदीर मागे ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी पुणे मुळ रा- महारवाडा, अवहातरबाला, बदनापुर, जालना हे त्याठिकाणी एका निळया रंगाच्या मारुती सुझुकी ऑल्टो कार मध्ये येवुन खाली उतरले. पोलीसांनी त्यांना पकडणेकरीता सापळा लावले असल्याचे त्यांचे लक्षात आल्यावर नमुद आरोपी हे वेगवेगळ्या दिशेने पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना नगुद पथकाने अतिशय शिताफीने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. सदर दोन्ही आरोपी यांची झडती घेतली असता त्या दोघांनीही त्यांचे कमरेस लोखंडी गावठी पिस्टल खोचलेले असल्याचे व त्यामध्ये प्रत्येकी ०२ जिवंत काडतुसे (राऊंड) असल्याचे दिसुन आले तसेच नमुद आरोपी ज्या मारुती सुझुकी ऑल्टो कार धुन आलेले होते. त्या कारची पाहणी केली असता सदर कार मध्ये ०२ लोखंडी गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसे (राऊड) मिळुन आले. त्यांचेकडुन ५,६०,००० /- रुपये किंमतीचे ०४ गावठी पिस्टल, 19,००० /- रुपये किंमतीचे १४ जिवंत काडतुसे (राऊंड) व १,००,०००/- रुपये किंमतीची मारुती सुझुकी ऑल्टो कार ही जप्त करण्यात आलेली आहे.

नमुद आरोपी यांचेकडे केलेल्या तपासात अटक आरोपी शरद साळवी याने त्यांचे इतर ०३ आरोपी साथिदारांसह मध्यप्रदेश राज्यामध्ये जावुन सदर गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे (राऊंड) आणले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी प्रमोद सोपान सांडभोर याचेविरुद्ध खुन तसेच खुनाचा प्रयत्न यासारखे एकुण ०८ गुन्हे दाखल असुन आरोपी शरद गुरलीधर साळवी याचेविरुध्द खुन, मारामारी व बलात्कार असे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत. तसेच पाहिजे आरोपी यांचेवर सुध्दा गंभिर गुन्हे दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नमुद आरोपीविरुध्द तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन, पिं.चि. येथे गु. र. नं. २९५ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) भा.द.वि.क. ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद आरोपी यांनी कट करुन ठराविक उद्देश साध्य करण्याच्या हेतुने अग्निशस्त्र आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यांना वेळेत अटकाव करून पोलीसांनी त्यांचा कट उधळुन लावला आहे. यामध्ये अजून इतर साथीदार कोण आहेत त्याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम है अधिक तपास करीत आहेत.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं.चिं.. मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि.. मा श्री सतिश माने साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि मा श्री बाळासाहेब कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुका, गुन्हे शाखा, पिं थिं. यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अबरिष देशमुख, पोलीस अमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद दीर, सुगित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी दरोडा विरोधी पथकास उत्तेजनार्थ रू. ५०,०००/- चे बक्षीस घोषित केले आहे.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणातून करणी सेनेच्या प्रमुखाला भररस्त्यात भीम सैनिकांनी केली मारहाण.

Next Post

सांगली: 1 लाख 25 हजाराची लाच घेताना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या. प्रशासनात खळबळ.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगली: 1 लाख 25 हजाराची लाच घेताना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या. प्रशासनात खळबळ.

सांगली: 1 लाख 25 हजाराची लाच घेताना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याला एसीबी ने ठोकल्या बेड्या. प्रशासनात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In