बातमी संकलन: मयुरी टेंभरे नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर दि.26:- पुज्य महाथेरो चंद्रमणी बुध्द विहार येते आरक्षणाचे जनक लोकराज्य छत्रपति शाहु महाराज यांचा 149 व्या जंयतीचे औचित्य साधुन परिसरातील दहावी, बारावी गुंणवंत विद्यार्थियाचे शाहु महाराज वरील पुस्तक, सर्टिफिकेट, पेन, फुल देवुन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख वक्ते म्हणुन लाभलेले नयन कांबळे सहा.आयुक्त आदिवासी विकास विभाग, नागपुर तसेच प्रदिप भावे, अन्न पुरवठा विभाग नागपुर यांचा हस्ते शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. तसेच विद्यार्थियांच कौतुक, अभिनदंन व पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर पुढे काय? असा मोठा प्रश्न त्याचां पुढे येतो. याचं सुयोग्य उत्तर त्यानां मिळावे म्हणुन ‘करियर गाईडन्स’ वर चर्चा करून मुलांना योग्य रिता परिस्थितिला मात करून आपल लक्ष लक्षात ठेवुन पुढे कस वाढायच आपल एक ध्येय निश्चित करुन आपल यशाच मार्ग सकारात्मक विचार ठेवुन पुर्ण कस करायच यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम व्यवस्थितरिता पार पाडण्यासाठी विहार मंडळातील प्रत्येक सदस्यानीं चिकाटीने काम करून शाहु महाराज जंयती साजरी केली. याप्रसंगी अध्यक्ष नितेश चौधरी, रतन कांबळे, प्रविन गजभिये, कुणाल टेभंरे, तुषार, अन्य सभासद, विद्यार्थि प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी मेश्राम आणि आभार अजय कोसे यांनी मानले.

