Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
आरएसएस नेत्याला मारहाण प्रकरणी 5 जणांना अटक, 2 फरार, हिंगणघाटात तणावपूर्ण शांतता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे नेते जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना रविवारी गुंडांनी मिळून मारहाण केली होती. त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यात दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, हिंगणघाट शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरएसएस संघटनेचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत हे रविवार 25 रोजी रात्री आर्वी ते हिंगणघाट बसने प्रवास करीत असताना पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी केली असता त्यांनाच शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर हिंगणघाट हद्दीत बस येताच नांदगाव चौरस्त्यावर बस थांबताच त्यांना 5 ते 6 जणांनी बसमधून खाली उतरवून मारहाण केली होती.

त्यामुळे यांनी जेठानंद राजपूत यांनी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे जाऊन मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही बातमी शहरात पसरताच शहरातील विविध हिंदूत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनला घेराव घालून आरोपींच्या अटकेची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी नुरुल हसन यांनी हिंगणघाट गाठून नागरिकांना संयम बाळगण्याची विनंती करीत चोवीस तासांत आरोपींना अटक करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रकरणी त्याच रात्री शेख तन्वीर आझाद इसामुद्दीन याला अटक केली. तर तन्वीरचा भाऊ नौशाद याच्यासह हिंमतखान, ईर्शाद व फिरोज या चौघांना 26 रोजी अटक करण्यात आली. यासोबतच अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही येत्या 24 तासात अटक करण्याचे आश्‍वासन तपास अधिकार्‍यांनी दिले. या प्रकरणी दोन दिवसांपासून शहरात असलेला तणाव निवळला असून नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. मात्र, पोलिसांनी खबरदारी घेत शहरात चोख बंदोबस्त ठेवल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रमेश मिश्रा करीत आहेत.

Previous Post

नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन.

Next Post

पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In