✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे नेते जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना रविवारी गुंडांनी मिळून मारहाण केली होती. त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यात दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, हिंगणघाट शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आरएसएस संघटनेचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत हे रविवार 25 रोजी रात्री आर्वी ते हिंगणघाट बसने प्रवास करीत असताना पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी केली असता त्यांनाच शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर हिंगणघाट हद्दीत बस येताच नांदगाव चौरस्त्यावर बस थांबताच त्यांना 5 ते 6 जणांनी बसमधून खाली उतरवून मारहाण केली होती.
त्यामुळे यांनी जेठानंद राजपूत यांनी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे जाऊन मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही बातमी शहरात पसरताच शहरातील विविध हिंदूत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनला घेराव घालून आरोपींच्या अटकेची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी नुरुल हसन यांनी हिंगणघाट गाठून नागरिकांना संयम बाळगण्याची विनंती करीत चोवीस तासांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी त्याच रात्री शेख तन्वीर आझाद इसामुद्दीन याला अटक केली. तर तन्वीरचा भाऊ नौशाद याच्यासह हिंमतखान, ईर्शाद व फिरोज या चौघांना 26 रोजी अटक करण्यात आली. यासोबतच अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही येत्या 24 तासात अटक करण्याचे आश्वासन तपास अधिकार्यांनी दिले. या प्रकरणी दोन दिवसांपासून शहरात असलेला तणाव निवळला असून नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. मात्र, पोलिसांनी खबरदारी घेत शहरात चोख बंदोबस्त ठेवल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रमेश मिश्रा करीत आहेत.

