मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व युवती जिल्हाध्यक्ष अश्विनी शिरपूरकर यांच्या हस्ते या नियुक्त्या करण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटन कौशल्य आणखी मजबूत करण्यासाठी तसेच युवक पाठोपाठ युवतीनी ही राजकारणात पुढे यावे व सक्षम व्हावे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी अश्विनी शिरपुरकर यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदी रुपाली सुपारे तर हिंगणघाट तालुका युवती उपाध्यक्ष पदी गौरी तेलहांडे, हिंगणघाट शहराध्यक्ष पदी माधवी देशमुख, शहर उपाध्यक्षपदी आचल पाटील, शहर संघटक कु. हेमलता मेश्राम हयांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांबुलकर, वर्धा शहराध्यक्ष सविता नारायण जुने, आर्वी विधानसभा संघटक सचिव सुनील बंड, अमोल मुडे, सुशील घोडे, गजु महाकाळकर, राजू मुडे, वैभव साठोने, रविकिरण कुटे, निखिल ठाकरे यांची उपस्थिती होती.

