आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबा.न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात 2 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हिंगणघाट येथे मालवाहू वाहनाच्या पंक्चर टायरची दुरुस्ती करणाऱ्या दोघांना मागाहून आलेल्या भरधाव ट्रकने जवळपास 51 फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. हा अपघात 27 जून रोजी मध्यरात्री 2.40 वाजताच्या सुमारास हिंगणघाट जवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेहांच्या चिंधड्या झाल्या.
याप्रकरणी ट्रकचालकास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश विठ्ठलराव कळंबे आणि ज्ञानेश्वर अण्णाजी महाजन दोन्ही रा. हिंगणघाट अशी मृतांची नावे आहे. तर पोलिसांनी ट्रकचालक आमीन सब बुरान सब रा. ताराटी कर्नाटक याला अटक केली आहे.

