✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर:- पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात ईद व आषाढी सण बंदोबस्त दरम्यान समुद्रपुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण (डि.बी) पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर , पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे, चा.पो.हवा. श्रीकृश्ण इंगळे व 14 गृह रक्षक दलाच्या सैनिकांनी दि 28 जून रोजी समुद्रपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात जमिनीत गाढुन व झुडपात लपवुन असलेले एकुण 153 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 10,950 लीटर गावठी मोहा दारूच्या निर्मिती करीता तयार करण्यात आलेला कच्चा मोहा सडवा रसायण, तीन पोत्यामध्ये अंदाजे 150 किलो गुळ व भट्टी साहित्य असा एकुण कि. 6,12,000 रूपयाचा माल मिळुन आल्याने, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीचं नाश करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो.अंम. अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे, श्रीकृष्ण इंगळे व 14 गृहरक्षक दलाच्या सैनिकांनी केली.

