महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यात आरोपीना पोलिसांनीच पाठीशी घालत असल्याचा पीडीत मुलीने व तिच्या कुटुबिंयांनी खळबळजनक आरोप केल्याने पोलीस विभागावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
संगमनेर येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नियोजित कट करून रोख दोन लाख रूपये आणि एक सोन्याचे बिस्कीट घेऊन मुलीला घेऊन अहमदनगर, शिर्डी, गुजरात, नाशिक असा प्रवास करण्यात आला. यावेळी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार देखील करण्यात आला. तसेच मुलगी गर्भवती राहू नये म्हणून तिला गोळ्याही देण्यात आल्या आहेत. तसेच तू फिरण्यासाठी गेली होती असे सर्वांना सांग नाहीतर तुझ्या भावाला आम्ही जीवे मारू, अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही खळबळजनक माहिती समोर आली असली तरी आतापर्यत आरोपीला पोलिसांकडून अटकही करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पिढीत मुलीचा आणि कुटुंबाचा गंभीर आरोप. पोलिस हे प्रकरण दाबन्यासाठी आरोपीला पाठीशी घालत आहे. त्यामुळे पीडित कुटुबांची अद्याप साधी तक्रारही घेण्यात आलेली नाही. आता या मुलीने व तिच्या परिवाराने आम्हाला न्याय द्या, आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी केली आहे. आता तरी पोलिस प्रशासन यावर काही ठोस पाऊले उचलून पीडित मुलीला न्याय देणार का हे पाहणे महत्वाचे राहील. दरम्यान तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

