संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की राजुरा येथील
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे नंदीबैल सजावट स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून गटसाधन समुह केंद्राचे देवेंद्र रहांगडाले , आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक दिपक सातपुते, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, दीपक मडावी, सोनल नक्षीने, प्रतिभा दरेकर, सविता गेडेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी नंदीबैल सजावट करीत असताना विविध सामाजिक संदेश दिले. अनेक विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या वेशभूषे मधे सहभाग दर्शवीला. आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध शैक्षणिक उपक्रम नेहमी राबवले जात असतात. उत्तम प्रकारच्या भाषण -संभाषण शैली व इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य येथील विद्यार्थ्यांनी हस्तगत केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेकरिता शालेय मंत्रिमंडळाने अथक परिश्रम घेतले.