Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटना, चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे निर्देश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटना, चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे निर्देश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीत या संशयितांनी देवळाली कॅम्पसह पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून पोलिसांनी ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सुनीलकुमार रघुनाथ विश्वकर्मा रा . संसरीगाव, नाशिक यांची दुचाकी चोरी झाल्याबाबत दि. ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने देवळाली कॅम्पचे गुन्हे शोध पथक तपास करीत असताना या पथकातील पोलिस नाईक राहुल बलकवडे यांना माहिती मिळाली की, भगूर येथे दोघे जण चोरीची दुचाकी विकण्यास आले आहेत. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन नाधव यांना कळविली व त्यांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता, आकाश पांडुरंग आंबेकर (२६, रा. मांगीर बाबासमोर, नांदूर नाका) आणि वैभव शिवाजी तौर (१९ रा. वृंदावननगर, नांदूर नाका) हे दोघे एका दुचाकीसह सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाल्याने दोन्ही संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयितांकडून एकूण ६ दुचाकी हस्तगत केल्या. त्यामध्ये म्हसरूळ पोलिस ठाण्याकडील २, पंचवटीकडील २ व आडगावकडील १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलिस हवालदार सुनील जगदाळे, हवालदार राजेंद्र गुंजाळ, रमाकांत सिद्धपुरे, नाईक राहुल बलकवडे, शिपाई एकनाथ बागूल, नितीन करवंदे, ताजकुमार लोणारे यांचा समावेश होता

Previous Post

आशादेवी शाळेत नंदीबैल सजावट स्पर्धा उत्साहात संपन्न, नंदीबैल सजावट स्पर्धेत विद्यार्थ्यानी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग.

Next Post

हिंगणघाट पुरपीडित कुटुंब अजूनही मदत पासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट पुरपीडित कुटुंब अजूनही मदत पासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

हिंगणघाट पुरपीडित कुटुंब अजूनही मदत पासून वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In