वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांना तात्काळ खाऊटी स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी…
🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात अतिवृष्टीने महापूर आला व अनेक घराचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून शासनाच्या वतीने पूरग्रस्तांना तात्काळ स्वरूपात आर्थिक मदत (खाऊटी) देण्यात आली परंतु हि आर्थिक मदतीपासून काही नागरिक वंचित असून त्यांना तात्काळ (खाऊटी) स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
जुलै महिन्यात विदर्भात अतिवृष्टी होऊन सर्वी कडे पूर आला.लोकांचा घरातील अन्न- धान्य सर्व पाण्यात वाहून गेले.अशा कुटुंबाना शासनाच्या वतीने तात्काळ (खाऊटी) स्वरूपात आर्थिक मदद करण्यात आली परंतु अजूनही पुरपीडित(पूरग्रस्त) लोकांना हि मदद मिळाली नसून ते मदतीपासून वंचित आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगणघाट पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात आले असता त्यांनी पूरग्रस्त कुटुंबाना भेट दिली ते कुटूंब सुद्धा आजपर्यंत आर्थिक मदतीपासून वंचित आहे. आज पावतो त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदद मिळालेली नाही. त्याची चौकशी करून ज्यांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळाली नाही त्या कुटुंबाना तात्काळ स्वरूपात आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त नागरीकांनी उपविभागीय अधिकारी यांना केली आहे.