हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- आज महिला अत्याचाराच्या घटने मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये रामनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशीच एक संतापजनक घटना घडली होती. त्या प्रकरणी चंद्रपूर न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल पारित करून आरोपीला कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
आपल्या घराबाहेर अंगणात झोपून असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी मनोज शंकर आडपेवार वय 38 वर्ष चंद्रपूर याला न्यायालयाने तीन वर्ष कारावास आणि तीन हजार रुपयाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.
रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जलनगरमध्ये 25 फेब्रुवारी 2019 रोजी एक अल्पवयीन मुलगी अंगणामध्ये झोपून असताना आरोपी मनोज आडपेवार याने दारूच्या नशेमध्ये तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस स्टेशनध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वावडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शामराव पोईनकर, पंजाबराव मडावी यांनी काम बघितले.
दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची तपासणी तसेच साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपी मनोज शंकर आडपेवार याला तीन वर्ष कारावास, तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणीत सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. देशपांडे यांनी काम बघितले.

