धुळे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धुळे:- महाराष्ट्र सध्या अपघाताची सृंखला सुरू असून धुळे जिल्हातून एक भीषण अपघाताची घटनेने महाराष्ट्र हादळले आहे. काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच पळासनेर गावाजवळ 16 चाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर वर खडी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्याने, भीषण अपघात झाला. यावेळी या ट्रेलरने 11 वाहनांना धडक दिली तसेच बसस्थानकाला धडकत ट्रेलर एका हाॅटेलवर जाऊन आदळला. या अपघातात 3 विद्यार्थी व दोन महिला, ट्रेलरचालक, सहचालकाचासह 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 23 जण जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघात प्रतापसिंग भीमसिंग गिरासे वय 70 वर्ष रा. पळासनेर, गीता मुरी पावरा वय 15 कोळशापाणी पाडा मोयदा-पळासनेर, मुरी सुरसिंग पावरा वय 28, रा. कोळशापाणी, संजय जायमल पावरा वय 38, रा. कोळशापाणी, रितेश संजय पावरा वय 14, रा. कोळशापाणी, किरमा डेबरा कनोजे वय 12 रा. आंबापाणी, सुनीता राजेश खंडेलवाल 50, रा. देवपूर धुळे, कंटेनरचालक कन्हैयालाल बंजारा वय 55, रा. जावदा जि. भिलवाडा चित्तोडगड, सहचालक सुरपालसिंग जवानसिंग राजपूत वय 52 रा. जावदा, ता. निंबाहेडा, दशरथ पावरा वय 35, रा. पळासनेर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हा भीषण अपघात मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर झाला. इंदूरकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरमध्ये 40 टनापेक्षा जास्त खडी भरली होती. पळासनेर गावाजवळील हरियाणा हॉटेलसमोर एक ट्रकचालक टायर बदलत असताना त्यास ट्रेलरने धडक देऊन एका दुचाकी गाडीला उडविले. त्यानंतर एका कारला जबर धडक दिली. त्यापाठोपाठ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी, स्कूल बस आदी वाहनांना धडक देत बसस्थानक व हॉटेल तुडवत कंटेनर उलटला. कंटेनरमधील असलेली 16 टनांपेक्षा अधिक खडी रस्त्यावर व बसस्थानका बाहेर उभ्या असलेल्या शाळकरी, लोकांच्या अंगावर पडल्यामुळे ते काही क्षणांतच खडीत दबले गेले.
पाच लाखांची मदत जाहीर…
या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

