श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बीडचे रहिवासी असलेले डॉ. उल्हास गंडाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान डीएचओ डॉ. अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून धाराशिव / उस्मानाबाद येथे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ. गंडाळ हे मूळचे बीडचे रहिवासी आहेत. ते अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत असणारे डॉ. गंडाळ यांची बीडला नियुक्ती झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. बीडचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे विनंती वरून बदली झाली आहे. डॉ. गंडाळ यांच्या माध्यमातून एक हक्काचा माणूस बीडला रुजू होणार असल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
बीड जिल्हाचे नवीन आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. गंडाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. पण बीड जिल्हात धासळलेली आरोग्य व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. आता डॉ. गंडाळ हे आपल्या गृह जील्हाला किती न्याय देऊ शकते हे पुढे समजेल.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

