आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अखिल भारतीय आयुषच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षेचे क्लास घेण्याच्या नावाखाली नराधम शिक्षकाने एका महिलेला योनक्रिया, कामसुत्र अशा वेगवेगळ्या गोष्टीविषयी बोलून त्यांच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत राहणार्या एका 26 वर्षीय एका महिलेने खडक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन (गु. रजि. नं. 221/23) नुसार तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारी वरून पोलिसांनी रविराज मोरे वय 50 वर्ष रा. मथुरा कॉम्प्लेक्स, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा खळबळजनक प्रकार करिअर डेव्हलपमोट अकॅडमी येथे 18 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी 50 वर्षीय रविराज मोरे हा भारतीय आयुष संस्थेच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षांचे क्लास घेतो, असे खोटे सांगितले. फिर्यादी महिलेने त्याला 21 हजार रुपये भरुन त्यांच्या क्लासला प्रवेश घेतला. त्या क्लासला गेल्यावर त्यांना योन क्रिया व पुसवन विधीबद्दल माहिती आहे का तसेच फिर्यादी यांना कामसुत्रबद्दल काहीतरी सांगा, असे म्हणाला. जर तुम्हाला याबाबत माहिती असेल तर अजंठा वेरुळ लेण्यात योन क्रियाच्या अनेक पोझेस आहेत तुम्ही पाहिल्या का, असे बोलून त्यांच्या शरीराचे अश्लिल पद्धतीने वर्णन केले. या शिक्षकाच्या अशा वागणुकीने या महिलेने त्याचा क्लास मध्ये शिक्षण घेण्यास नकार दिला. क्लास करण्यासाठी भरण्यात आलेले 21 हजार रुपये परत मागितले. तेव्हा त्याने पैसे परत करण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे ही सर्व हकीकत फिर्यादी महिलेने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने या मुलीला धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.

