संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाने राज्यभरात लावलेल्या वीज मीटरपैकी सुमारे 9.6 लाख मीटरमध्ये बिघाड आहे. महावितरणच्या अहवालात याचा खुलासा झाला आहे. याचा फटका सामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे. मीटरमध्ये बिघाड असतानाही महावितरण बिलाचे समायोजन करण्यास तयार नाही. चुकीच्या रीडिंग नुसारच ग्राहकांना बिल भरावे लागत आहे.
वीज महावितरणचे नवनियुक्त अध्यक्ष तथा सह व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र हे पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसा अगोदर त्यांनी कंपनीच्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद होता. यावेळी त्यांनी मीटरच्या स्थितीचा देखील यावेळी आढावा घेतला होता. बिघाड असलेले विघुत मीटर हे नागरिकांचा खिसा रिकामा करत आहे. तर दुसरीकडे सरकार या कडे डोळेझाक करून नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. त्यात वीज महावितरणचे कर्मचारी व अधिकारी हे मीटरचा तुटवडा असल्याचे कारण देत हे बिघाड असलेले मीटर बदलून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी ग्राहकांना दुप्पट पैसे मोजून बाजारातून मीटर खरेदी करावे लागत आहेत. विदर्भात अशा ‘फॉल्टी’ मीटरची संख्या 2.25 लाख इतकी आहे. या फॉल्टी’ मीटरची संख्या नागपूर झोनमध्ये 25 हजार असून गोंदिया 12 हजार ,चंद्रपूर 29 हजार, अमरावती 80 हजार व अकोला येथे 78 हजार मीटर फॉल्टी असून ते कधी बदली करून दिली जाईल या अशीच नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाणार.
आता वीज मीटरचा पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरण करीत आहे. एकूण ग्राहकांची संख्या 3 कोटी आहे. 3 टक्के मीटर फॉल्टी आहेत. कंपनीला फॉल्टी मीटर बदलण्यासाठी दरमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या कनेक्श्नसाठी देखील मीटरची मागणी असते.
विभाग – फॉल्टी मीटर
नागपूर विभाग – 2.25 लाख मीटर फॉल्टी औरंगाबाद विभागात – 2.43 लाख मीटर फॉल्टी कोकण विभाग – 3.28 लाख मीटर फॉल्टी पुणे विभाग – 1.63 लाख
इतक्या मोठया प्रमाणात मीटरचा तुटवडा का? केंद्र सरकारच्या निर्देशावर आता महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लागणार आहेत. 15 हजार कोटी रुपयांच्या एकूण 7 निविदा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीज महावितरणने परंपरागत मीटरवर दुर्लक्ष केले आहे. यावर्षी ऊन कडक आहे. त्यामुळे मीटर जळण्याची संख्या वाढली आहे. यामुळे मीटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.कंपनीला फॉल्टी मीटर बदलण्यासाठी दहमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या कनेक्शन साठीदेखील मीटरची मागणी असते.

