✒️प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि सेवन कायद्यान्वये प्रतिबंध आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात ठिकठिकाणी खुलेआमपणे तंबाखूचा वापर होत असल्याचे दिसते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी दंडात्मक कारवाईची मोहिम राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सचिन तडस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संजय गायकवाड, डॉ. हिवरे, डॉ. कोडापे, डॉ. नम्रता सलुजा आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा, शासकीय, निमशासकीय संस्था, खाजगी आस्थापना तंबाखू मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. शासकीय संस्थांच्या आवारात तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करा. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

