अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:– जिल्हातील बाळापूर येथिल सायन कॉलनी शेळद अकोला नाका येथे विद्युत खांब असून सुद्धा आतापर्यंत ग्रामपंचायत शेळद यांनी लाईट लावण्यात आले नाही. ग्रामपचायतच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाला आहे. ही कॉलनी धरणाच्या जवळच असून त्यामुळे या परिसरात पाणी पिण्यासाठी काही जंगली प्राणी येतात. तसेच या परिसरात साप, विंचू यासारखे धोकादायक प्राण्याचा वावर असतो. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण प्रशासनाला जबाब विचारले तर प्रशासनाकडुन सांगण्यात आले की, आपल्या ग्रामपंचायत शेळद कडे 15 ते 17 लाखापर्यंत थकबाकी आहे. त्यामुळे आम्ही मीटर व लाईट दिले नाही.
आमच्या संपूर्ण पॅनल व नागरिकांची आपणास विनंती आहे की ग्रामपंचायत चा गलथान कारभार लवकरात लवकर मार्गी लावून येणाऱ्या दोन-तीन दिवसात लाईटचे व्यवस्था करून देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी नागरिक व बहुजन एकदा पॅनलचे सदस्य व अध्यक्ष यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी निवेदन देताना बहुजन एकता पॅनलचे अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके, तन्वीर अहमद गुलाम गोस, सचिन भारसाकळे, आयाज खान अन्सार खान, सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

