पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- अमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक एस. डी. नरके तसेच अमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस अंमलदार हे परिमंडळ १ ते ५ मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक ०७/०७/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक इसम महात्माफुले भाजी मंडई, विश्रामबाग, पुणे येथे अफीमच्या बांडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ व गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, उप-निरीक्षक एस. डी. नरके व अंमलदार यांनी महात्मा फुले मंडई गेट क्रमांक १, समोर, पुणे येथे सापळा लावला असता एक इसम सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोत घेवून उभा असलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव जगदीश कालुजी जाट, वय २७ वर्षे रा. वांजळे पाटील याचे वाडयातील पत्र्याचे शेडमध्ये, महात्मा फुले मंडई, पुणे व मुळ गाव तहसील गंगरार. जि. चितोड, राज्य राजस्थान असे सांगीतले त्याची झडती घेता त्याचे ताब्यात एकुन कि.रु ९२.५०५ /- चा ०६ किलो १६७ ग्रम अफीमच्या बोडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ व कि.रु. २६००० /- चा ०१ किलो ३०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व १०,०००/- रु चा मोबाईल संच असा एकुण १.२८५०५/- चा ऐवज व अंमली पदार्थ पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके यांनी जप्त केला. त्याचे विरुद्ध पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १४५ / २०२३ एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८ (क) १५ (ब). २०(ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक निबांळकर नेमणुक विश्रामबाग पो.स्टे. पुणे हे करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, युवराज कांबळे, संतोष देशपांडे, संदिप जाधव, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

