मोर्चाला हजारोच्या संख्येने सहभागी व्हा: डॉ. किशोर त्रिभुवन जिल्हा महासचिव यांचे आव्हान.
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- महाराष्ट्र मध्ये दिवसेंदिवस मागासवर्गीय दलीत, मुस्लिम, बौद्ध समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने दिनांक 10 जुलै 2023 सोमवार रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा मध्ये संपूर्ण जालन्या जिल्ह्यासह परतूर व मंठा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन यांनी केले आहे.
डॉ. किशोर त्रिभुवन यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस मागासवर्गीय दलीत, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार वाढलेले आहेत या वाढलेल्या अन्याय अत्याराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने जालना जिल्हा येथे जिल्हा अधिकारी कार्यालय जालना येथे दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 11:00 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे तरी परतूर व मंठा तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढल्यात येणाऱ्या या मोर्चाचे निमंत्रक तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे, जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष बाबू गोसावी, शहर अध्यक्ष राहुल नाटकर, तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणे, शहर महासचिव अशोक ठोके, तालुका सचिव संकेत प्रधान, तालुका सदस्य बाळू झोटिंग, तालुका सदस्य अझर पटेल, तालुका सचिव आकाश मुंडे, दीपक हिवाळे, बाळासाहेब कदम, नितीन खरात, प्रदीप साळवे, विकास उमप, रमेश कदम, जमीर शेख, अमोल जाधव, बाबासाहेब कोळे, सोयब पठाण, संदीप मोरे, किरण प्रधान, सुनील भदर्गे, चंद्रकांत मस्के, समाधान मांधळे, गौतम मस्के, लखन केवट, नामदेव लहाने, मोहन माने, सचिन गरड
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445345/7385445348

