संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
पाचगाव:- खालील वृत्त खालील प्रमाणे शेतकरी आणि शेती मातीतल्या माणसांचा सर्वात मोठा सण म्हणून बैलपोळ्याकडे पाहिल्या जाते, हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज राजुरा तालुक्यातील पाचगाव या गावी पोळा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला, सर्व बैलांना सजवून एकत्रित करून गावचे कुलदैवत असणाऱ्या हनुमान मंदिरापासून भजन, आरतीने मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली, गावकऱ्यांच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार न होता बैलपोळा साजरा करण्यात आला.
बैल पोळा असल्यामुळे गावात सकाळ पासून जयत तयारी सुरू होती. या बैल पोळाला पाचगाव येथील महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सर्विकडे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.