मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
या संतापजनक घटने नंतर पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, माझी पत्नी रेल्वेने दिल्लीला निघाली होती याचदरम्यान ती काही वस्तू खरेदी करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आली. परंतु तिथे असलेल्या एका व्यक्तीने मी तुम्हाला रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळून देतो असे सांगत या महिलेला त्याने रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका निर्जन स्थानी नेले. जीथे आधीच तीन ते चार नराधम दबा धरून बसले होते, त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
35 वर्षीय पीडित महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असून तीचे लग्न सहा महिन्यापूर्वी जयपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कलम 376 (डी) अतर्गंत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, तपासादरम्यान या महिलेने त्यातील एका तरुणाला ओळखत असल्याचे म्हटले आहे.
महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुजेटच्या मदतीने तपास सुरू आहे. तसेच या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मेडीकल रिपोर्टनंतरच तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मला रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती भेटली, तिने आपल्याला तिकीट आरक्षीत करून देतो, तसेच जेवण देखील देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने मला एका निर्जन स्थानी नेले तिथे आधीच तीन ते चार लोक होते. त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
