प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संताजी महाराज पालखी सोहळा समिती कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा सत्कार करण्यात आला.
संत जगनाडे महाराज पालखी सोहळा अल्लीपूर ते पंढरपूर पायदळ पालखी दरवर्षी निघतात. पालखी निघाली असता त्यावेळी अतुल वांदिले या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. याप्रसंगी संत जगनाडे महाराज यांचा पालखीचे पूजन करत दर्शन घेतले.
आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षी अल्लीपुर परिसरातील सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला जातात. पंढरपूर वरून परत येताच पालखी सोहळ्यातील मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या निवासस्थानी येऊन शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी अतुल वांदिले यांनी सर्व वारकरीचे आभार मानले. याप्रसंगी पालखी सोहळ्यातील वारकरी देवरावजी गोडखांदे, सुरेशराव घुसे, वामनराव सेलकर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

