प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 9 जुलै 2023 ला सम्यक बुद्ध विहार, प्रबुद्ध नगर हिंगणघाट येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, शाखा हिंगणघाट द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या धम्म शिबिराची अध्यक्षता विठ्ठल दांडगे (प्रचारक, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क) यांनी केली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या अस्मिताताई भगत यांनी केले. कार्यक्रमाला भंते जीवक (प्रचारक, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क) प्रलय तेलंग (अध्यक्ष, सम्यक बुद्ध विहार, हिंगणघाट) गजाननजी माऊसकर (अध्यक्ष, राष्ट्रीय पिछ़डा वर्ग मोर्चा, हिंगणघाट) साधुसिंगजी भादा (अध्यक्ष, राष्ट्रीय शीख मोर्चा, हिंगणघाट) कुंदाताई गोडघाटे (तालुकाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, हिंगणघाट) उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल दांडगे (प्रचारक, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क) यांनी उपस्थितांना ‘मी भारत बौद्धमय करीन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (एक समीक्षा) तसेच ‘सम्राट अशोक द्वारानिर्मित भारतातील लेण्या, स्तूप आणि चैत्य ही बुद्धिस्ट लोकांची विरासत आहे यावर काही लोकांचा असलेला अवैध /अनैतिक कब्जा दूर करून ते बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात असणे काळाची गरज आहे.’ या विषयावर विस्तृत, सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आणि बौद्धांची विरासत ब्राह्मणांच्या ताब्यातून लवकरात लवकर मुक्त करण्याचे व त्यासाठी साथ सहयोग करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलिनीताई कांबळे यांनी केले. विजय झाडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले व चेतन ढोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला सीमाताई मेश्राम, सिंधुताई दखणे, सुशीला सलाम, अनिता मरापे, वासंती देवगडे, आशा भगत, बेबीताई शेंडे, उज्वला कांबळे, कुंदा फुलझले, राधा काळे, आराध्या जंगम, शकुंतला तेलतुंबडे, पल्लवी डोंगरे, थुल, शोभा बनकर, कुंदा जगताप, सरस्वती निमसरकार, आम्रपाली चांदेकर, वत्सला लिहितकर, मंदा मून, शीला खोब्रागडे, सरोज मस्के, रजनी म्हैसकर, लता तलांडे, माधुरी आत्राम,माया तामगाडगे, सरिता देवगडे, संगीता गाठले, ज्योती मेंढे, कमल धोंगडे, अनिता नगराळे, कुंदना जगताप, वेणूताई चहांदे, अहिल्या थोरात, वैशाली धाबर्डे, कमल पाटील,शकुंतला मेश्राम,चंद्रकला लोखंडे, तारा डोईफोडे, नम्रता वनकर,रूख्मा तामगाडगे,आशाताई डोंगरे, शकुंतला खोब्रागडे,कांचन डोंगरे, कालींदाबाई जगताप, वंदना निमसरकार, आधिका ताकसांडे, हर्षदा वानखेडे, कामिना वावरे, मंजुळा भालशंकर, निर्मला गौरकर, आशा थुल, सरिता रंगारी, अनामिका झपाटे, माधुरी शंभरकर, वनमाला भानसे, शशिकला नरांजे, सानिया हुके, ज्योती गायकवाड, लक्ष्मी गेडाम, वंदना मांडवे, सुमित्रा वानखेडे, सुनीता वानखेडे,वनिता कांबळे, मीरा काळे तसेच मोठ्या संख्येने धम्म उपासक उपासिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता लक्ष्मीकांत जवादे, संजय डोंगरे, चंद्रहास्य कांबळे, मयूर पाटील, राष्ट्रपाल वासनिक, प्रतीक गायकवाड, आकाश दुर्गे अतुल थुल दिलीप कांबळे, भगवान मगर, संकेत ढोरे, प्रवीण मेंढे, गजानन वराडे, गेम देव मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

