उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- महानगर पालिके मधील सांगली मिरज रस्त्यावर महात्मा जोतिबा फुलेंची उद्यानातील सुशोभीकर णाच्या माध्यमातून विडंबना करण्यात येत असल्याचा आरोप सेवक लोकहित मंचकडुन प्रशांत कदम यांनी केला ते पुढे म्हणाले कि महापुरुषांची आठवण हि फक्त जयंतीनिमित्त किंवा पुण्यतिथीनिमित्तच येते इतर वेळेस त्यांचा आचार विचार सुद्धा येत नाही आम्ही गेली अनेक वर्षांपासून ह्या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी पाठ पुरावा करत आहोत परंतु महानगरपालिका क्षेत्रातील ह्या उद्यान्याचा जाणुन बुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सांगली महानगरपालिकेने दोन वेळेस निधी मंजूर करून सुद्धा हे उद्यान सुशोभिकरणापासुन वंचित आहे. त्यात आताचे भाजपाजे आमदार आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी हे उद्यान सुशोभिकरणासाठी पंधरा लाख मंजूर केल्याची घोषना केली पण तो निधी कुठल्या कारणास्तव तटला आहे? सुशोभिकरण कधी सुरू होणार? महानगरपालिकेने तेथील अस्थापनास ती उद्यानाची जागा पार्किंग साठी नियोजित करून दिले आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असुन येणाऱ्या आठ दिवसात ह्या उद्यानाचे सुशोभिकरणास सुरूवात करण्यात आले नाही तर सेवक लोकहित मंचकडुन जन आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

