प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सेवाग्राम येथील एक समाजमन हेलावणारी घटना समोर आली आहे. घरा शेजारी असणारे कुणी बोलत नाहीत, त्यात परिस्थिती एकदम हलाखीची गरिबीची मुलीच्या अंत्यसंस्कार करायला खिश्यात एक दाणा नाही. या विचाराने ग्रासलेल्या एका कुटुंबाने आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह घरातच पुरला ही खळबळजनक घटना सेवाग्राम पोलीस स्टेशनचा हद्दीतून समोर आली आहे.
घरात एक दमडी नाही, घराच्या शेजारी राहणारे कोणी बोलत पण नाही त्यात मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्युदेहवर अंत्यसंस्कार करायचे तरी कसे, विवंचनेत अडकलेल्या एका कुटुंबाने आपल्या मनोरुग्ण असलेल्या मुलीचा मृतेदह घरातच पुरला. आणि शांतीने आपले जीवन जगू लागले जनु काही घडलच नाही. हे सर्व 10 दिवसा अगोदर घडल.
स्थानिक सेवाग्राम पोलिसांना याबाबत सूत्राकडून गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहीतीच्या आधारावर त्या मुलीचा घरात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना सेवाग्राम येथील आदर्श नगर येथून गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही समोर आली.
काय आहे प्रकरण?
प्रवीणा साहेबराव भस्मे वय 37 वर्ष या मुलीचा मृत्यू झाला. प्रवीणा ही आदर्श नगर परीसरात आई, वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहत होती. प्रवीणा ही मनोरुग्ण असल्याने फारशी बाहेर वावरत नव्हती. तीन जुलै रोजी तिची प्रकृती अधिकच खालावली. रात्री 7.30 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी शेजारच्या कुणालाही माहिती दिली नाही. कोणीच बोलत नसल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अंत्यसंस्कारासाठी खर्च करण्याइतकीही त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. दुसऱ्या दिवशी म्हणजे चार जुलै रोजी सकाळी साडेसात वाजतादरम्यान वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत भस्मे यांनी कुणालाही कुणकुण न लागू देता घरातील पहिल्या खोलीत चार-पाच फुटांचा खड्डा खोदला. त्यात प्रवीणाचा मृतदेह पुरला. घरात काहीही घडले नसल्याप्रमाणे सारे वावरत असल्याने कुणालाही तिच्या मृत्यूची वार्ता कळली नाही.
गुरुवारी सेवाग्राम पोलिसांना याविषयीची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी भाऊ प्रशांत याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रवीणाच्या मोठ्या बहिणीचाही वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. त्या वेळी शेजाऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी मदत केली होती. या घटनेत हे का घडले नाही, याचा शोध पोलिस घेत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

