हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक खाजगी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मूल – चंद्रपूर मार्गावरील एमआयडीसी परीसरात स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला अपघात झाला. 15 जुलै रोजी मध्यरात्री रात्री 12 वाजताच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.
रायपूर येथून 45 मजूर प्रवासी घेऊन एक खाजगी बस हैदराबादला जात होती. भरधाव जाणारी स्लीपर कोच टायगर कंपनीची ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले. गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर मूल नजीक एमआयडीसी टी पाँईटजवळ ती भरधाव असल्याने रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटली. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. या ट्रॅव्हल्सचा चालक इसराइल खान वय 40 वर्ष रा. शिवनी मध्यप्रदेश याचेवर कलम 289 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात कुणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

