पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- श्री. शरद प्रकाश घंटे हे दि. ०८/०७/२०२३ रोजी मध्यरात्री ०१/०० वा चे सुमारास शिवाजी पुतळा चौक येथील निर्मला अॅटोमोबाईल्स येथे बसले असताना दुचाकी वरून आलेल्या तीन अनोळखी इसमानी त्यांना कटरचा धाक दाखवून त्यांच्या खिश्यातील मोबाईल फोन व रोख रक्कम बळजबरीने काढुन घेतली म्हणुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टरं १३८ / २०२३ भादवि कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील दाखल गुन्हयाचा तपासाबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे, सपोफी भिवरे, पोलीस हवालदार राजपुत पोलीस हवालदार फडतरे पोलीस हवालदार साठे, पोलीस हवालदार सय्यद यांनी गुन्हयातील घटनास्थळी भेटी देवून तेथील गोपनीय साक्षीदारकडे सखोल चौकशी करून तसेच पोलीस हवालदार रणजित फडतरे यांनी यातील आरोपी आलेल्या व घटनास्थळावरून गेलेल्या मार्गावरील १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज चेक करून गुन्हयातील अनोळखी आरोपीची ओळख निश्चीत केली. त्यास अनुसरुन नमुद पथकाने दि. ११/०७/२०२३ रोजी त्यातील एका विधीसंघर्षीत चालकास ताब्यात घेतले त्यास विश्वसात घेवून त्याच्या साथीदारांची सपुर्ण माहिती प्राप्त केली व त्यांचा शोध चालु केला. मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांच्या आदेशाने दिनांक १४/०७/२०२३ -रोजी २२/०० वाजता चालु केलेल्या ऑल आउट कॉम्बीग ऑपरेशन दरम्यान पोलीस हवालदार प्रविण राजपुत यांना यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील वाटसरुना लुटणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपी दळवी हॉस्पीटल येथे थांबलेला आहे. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना कळविल्यावर त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जावून वरील स्टाफने तो पळुन जाण्याच्या तयारीत असताना शिताफीतीने पकडले व पुढील तपास कामी पोलीस स्टेशन येथे आणले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याचे नाव विनायक गणेश कापडे वय २१ वर्षे, रा. एसआरए बिल्डींग ई/७०१ युमनानगर विमाननगर पुणे असे सांगुन त्याचा मित्र मंगेश काकडे व एक विधीसंघर्षीत बालक यांच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तपासादरम्यान त्यांनी जबरी चोरी केलेला फिर्यादीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे..
सदरची कामगिरी मा. प्रविण कुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीपसिंग गिल्ल, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०१. मा. रमेश कुंवर, सहा पोलीस आयुक्त. विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे तपासी अधिकारी अर्जुन नाईकवाडे, सपोका भिवरे, पोलीस हवालदार रणजित फडतरे, पोलीस पोलीस हवालदार राजपुत पोलीस हवालदार साठे, पोलीस हवालदार सय्यद यानी केली आहे..

