अजितदादा पवार यांच्याकडे दिलीप पोटफोडे यांची माजी केंद्रीय मंत्री संपर्क प्रमुख सुबोध मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मागणी.
अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- विदर्भातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक सुबोध मोहिते पाटील यांच्या पुढाकारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय बंगला देवगिरी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वर्धा जिल्ह्यातील सुद्धा महत्वाचे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, आर्वी विधानसभा क्षेत्रातून दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात बैठकीला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विदर्भात संघटन वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे, व कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटलांनी विदर्भात पक्ष संघटना मजबूत करने तळागाळात पोहचवणे सर्व स्तरातील नागरिकांचा विचार करून सर्वांगीण विकास करणे पदाधिकारी कार्यकर्त्याना बळ देणे, सर्व बाबीवर चर्चा झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत म्हटले की, विकासासाठी विदर्भाला प्राथमिकता देऊ इतक्या वर्षात राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी पक्ष पूर्णपणे पदाधिकारी सह उभा आहे असा ठाम शब्द दिला. यावेळी दिलीप पोटफोडे यांनी गाव तिथे उद्योग व आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तिन्ही तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील विकास कामासाठी राज्यसभा खासदार व विधान परिषद आमदाराकडून फंड उपलब्ध करून देण्याच्या मागणी केली असता मान्य करत लवकरच पूर्तता करू असा शब्द दिला. यावेळी कमलेश चिंधेकर, शोएब खान, दिनकर कोयरे, रोषण तेलंग, तुषार वाघ, चंद्रशेखर साहू,अकमल भाई,रोषण राऊत,व वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

