उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सदैव सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे युवा मल्टिपर्पज फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष. मा. पै. विक्की भाऊ गिते यांच्या वाढदिवसा निमित्य दरवर्षी प्रमाणे यंदाही पिंपळगाव, तामसी, चिंचोली गणू येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोट बुक व पेन पेन्सिल वाटप करून चिमुकल्या मुलांन सोबत वाढदिवसा साजरा केला.
युवा मल्टिपर्पज फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै विक्की भाऊ गिते नेहमी गोरगरीबांना मदत होईल असे विविध उपक्रम राबवित असतात. युवा मल्टिपर्पज फांउडेशनचे सदैव गोरगरीबांच्या मदतिला धाऊन जाणारी संघटना आहे.त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम राबवित असल्या बद्दल गावातील नागरिकांनी त्यांना सन्मानित केले.यावेळी उपस्थित सर्व मित्र मंडळी म.पै.राहुल भाऊ भालतिलक मा. पै ओम भाऊ माहोरे, गोपाल ठाकूर, संकेत नागरे, प्रणित खंडारे, शशांक नागरे, सागर गावडे, ऋषी येमतकर, रोशन काकडे, रोहित कराड ,सोहम मिसाळ, आयुष कालेवार, रोहित भटकर , किशोर सोनवणे, भूषण गोतमारे, शुभम इंगळे, आधी गावकरी मंडळी उपस्थित होते.

