हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महामणा डाॅ. संजय कुमार निषाद कॅबिनेट मंत्री मत्स्य विभाग तथा राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेश यांच्या विचारांचा वारसा समोर वाढविण्यासाठी चंद्रपुर शासकीय विश्राम गृहात निषाद पार्टीच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजू लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विदर्भ अध्यक्ष प्रा. राहुल गौर आणि संपर्क प्रमुख सुनील ढाले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि गावखेड्यात शाखा उभारण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही कार्यकर्ते लोकांना पदोन्नति देण्यात आली. त्यात राजकुमार निषाद यांना विदर्भ सचिव पद देण्यात आले. तर चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष रामभरोसे निषाद, चंद्रपुर जिल्हा सचिव पितांबर कश्यप बल्लारपुर विधानसभा उपाध्यक्ष ओमप्रकाश निषाद, बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुरेश केवट, महिला लिगल सेल जिल्हा अध्यक्ष ॲड. कांचनताई दाते यांची निवड करण्यात आली असुन त्या वेळी निषाद पार्टी ची संपुर्ण विधानसभा क्षेत्रात बांधनी करू असे प्रतिपादण जिल्हाअध्यक्ष राजू लांडगे चंद्रपुर यांनी केले.
लवकरच निषाद पार्टी चंद्रपुर जिल्हात सक्रियेतेने काम करणार असा विश्वास विदर्भ अध्यक्ष प्रा. राहुल गौर यांनी व्यक्त केला. यावेळी संपर्क प्रमुख सुनील ढाले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी चे अभिनंदन करत अजुन नवी कार्यकारणी लवकरात लवकर घोषित करा असा सल्ला त्यांनी दिला. या वेळी चंद्रपुर बल्लारपुर चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

