आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी करून दारू बंदीचा उद्देशाला काळे फासले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात वर्धा पोलीस यांच्यावर अंकुश ठेवण्याची तयारी करत आहे. त्यात पुलगाव हद्दीत येणाऱ्या वायफड रस्त्यावर नाकाबंदी केली असता पोलिसांनी चारचाकी वाहनासह देशी विदेशी दारुसाठा मोठ्या प्रमाणात साठा हस्तगत केला आहे. पोलिसांनी कारसह एकूण 7 लाख 7 हजार 100 रुपयांचा दारुसाठा जप्त करुन एका आरोपीस अटक केली. तर बार मालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पुलगाव पथकाने केली.
यावेळी पोलिसांनी मनोज उर्फ बंटी गंगाधर काठाणे वय 31 वर्ष रा. वायफड असे अटक केलेल्याचे नाव आहे तर लकी बारचा मालक राजू जैस्वाल रा. सावंगी मेघे हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पुलगाव येथील पथक पुलगाव हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. गोपनीय माहितीनुसार वायफड रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली असता MH02JP9960 या क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुसाठा मिळून आला. पोलिसांनी दारुसाठा जप्त केला. दारुसाठा अमरावती जिल्ह्यातील लकी बार येथील राजू जैस्वाल याच्या बारमधून आणल्याची माहिती पोलिसांना त्याने दिली. यावरुन पोलिसांनी राजू जैस्वाल याच्याविरुद्धही पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, सुभाष राऊत, अवी बन्सोड, संजय राठोड, अमोल ढोबाळे यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

