मालमत्ता घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ तोडगा न काढल्यास दिला होता आंदोलनाचा इशारा
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी (रेल्वे) येथील नगर पालिकेने घरावर आकारण्यात येणाऱ्या करात 35 ते 40 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे झालेली वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मालमत्ता घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ येथील पालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा समस्त सिंदी शहरातील नागरिकांच्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता स्थानिक झेंडा चौकातून निघणार आहे.
येथील नगर पालिकेने घर टॅक्स दरात भरमसाठ वाढ केली होती. या वाढीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात 12 जुलै रोजी पालिकेला घेराव घातला होता. दरम्यान अचानक घातलेल्या घेरावाने मुख्याधिकारी कार्यालयात गोधळ उडाला होता. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी फोनवर बोलून झालेल्या घर टॅक्स वाढीबाबत 10 दिवसात लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा पालिका प्रशासना विरोधात 21 जुलै रोजी भव्य आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला होता. परंतु, नगर पालिका प्रशासनाने अद्याप या कर वाढीबाबत कोणताही तोडगा काढला नाही.
घरगुती टॅक्समध्ये 35 ते 40 टक्के वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. नगर पालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा, नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रिक्त पदे भरण्यात यावी तसेच नगर पालिका प्रशासनाचा मनमानी कारभारावर अंकुश लावावा या मागणीसाठी मालमत्ता कर वाढीच्या निषेधार्थ सिंदी नगर पालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा शहरातील नागरिकांच्या नेतृत्वात धडकणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

