मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सध्या वरुणराजा धो धो बरसत आहे. परंतु या पासून बचाव करण्यासाठी अनेक निराधार, वृध्द दुर्बल व्यक्ती यांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे साधन साधने मिळत नाही. समाजातील अश्या घटका करीता नारायण सेवा मित्र परिवाराने रेनकोटच्या स्वरूपात सहारा दिला आहे.
नारायण सेवा मित्र परिवाराने पावसापासून बचाव करण्याकरिता शहरातील अश्या वृध्द, निराधार, अपंग व्यक्तींना स्थानिक कारंजा चौकात आयोजित कार्यक्रमात रेनकोटचे निःशुल्क वितरण करण्यात आले. यावेळी अशोक आकडे, उपाध्यक्ष पी. व्ही. टेक्सटाईल्स ली. जांब, भैयाजी निखाडे, पी. व्ही. टेक्सटाईल्स लि. जाम,अशोक मिहानी, संचालक अशोका इंडस्ट्रीज, हिंगनघाट आदी मान्यवरांचे हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजना करिता नारायण सेवा मित्र परिवाराचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी नारायण सेवा मित्र परिवाराच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

