मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्रपरिवार या सेवाभावी संस्थेच्या वतीने अधिक मास आणि श्रावण मास चे पावन पर्वावर स्थानिक गौरक्षण संस्थेत श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले. तसेच विविध प्रजातीच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या परिसरात उगवलेले गवत अनावश्यक उगवलेली झाडे काढून टाकण्यात आली व संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी गोमातांना दहा किलो ढेप व चारा देण्यात आला.
या उपक्रमात नारायण सेवा मित्र परिवार चे अध्यक्ष महेश अग्रवाल, महेश दीक्षित, वासुदेव त्रिवेदी, लक्ष्मीकांत मेढे, अरुण पंडित, रमेश रानपारा, सुभाष लालवानी, दुर्गाप्रसाद यादव, एड. इब्राहिम बक्स, विक्की ठाकुर, ब्रिजमोहन करवा, अशोक सिंघवी, विजय मुथा, सुनील डांगरे, अमोल भूतड़ा, रानपारा , कंचन खिवसरा, किरण अग्रवाल, कंचन ठाकुर, अर्चना जोशी आदी सहभागी होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

