डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन देहूरोड .ता:२४ जुलै:- जबरी चोरी करणारे चोरटे देहुरोड पोलिसांच्या हाती लागले आहेत .या चोरट्यांकडून चोरलेल्या ०५ऑटो रिक्षा आणि १९महागडे मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत .विशेष बाब म्हणजे देहूरोड पोलीस एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासात या चोरट्यांनीऑटो रिक्षा देखील चोरी केलेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यां मध्ये एका माहिलेचा आणि दोन अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे .पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 1) नागेश बाळू भंडारी वय २० वर्ष, 2) निकिता किरण शिंदे वय २२ वर्ष दोघेही रा.महातोनगर वाकड अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार ता.२० रोजी आर .के .कॉर्नर .साईनगर येथे चालत पायी जात असताना त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची घटना घडली होती. चोरटे हे एका ऑटो रिक्षा मधून आले होते. त्यामध्ये एक महिला तीन जणांचा समावेश होता देहूरोड पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्याचा देहुरोड पोलीस स्टेशन मधील तपास करीत असताना पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे वाकड परिसरातील आहेत .पथकाने वाकड परिसरातून सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे जबरी चोरी केलेला महागडा मोबाईल फोन मिळून आला पोलिसांनी तो हस्तगत केला.
यावेळी आरोपींना पोलीस कोठडीमध्ये रिमांड घेऊन त्यांच्याकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपींनी त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुरुवार तारीख २०रोजी पुनावळे येथे एका इसमाचा जबरदस्तीने मोबाईल फोन चोरी केल्याचे तसेच, थेरगाव, वाकड, सांगवी, पिंपरी परिसरातून ०४ ऑटो रिक्षा आणि पिंपरी चिंचवड परिसरातून १८ मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ०५ ऑटो रिक्षा आणि १९ महागडे मोबाईल असा एकूण ०८ लाख ८६हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. यामध्ये देहूरोड, पिंपरी, रावेत पोलीस स्टेशन हद्दीत ०१ सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी ०२असे एकूण ०७ चोरीचे गुन्हे उघडकीस आल्या आहे. अटक केलेला आरोपी नागेश भंडारी हा सराईत गुन्हेगार आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहुरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, वेतन कानगुडे, निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, शुभम बावनकर, संतोष महाडिक, कैलास शिंदे, सागर कळमकर, संतोष भरत, महिला पोलीस कर्मचारी सुनीता पटेकर, दिपाली शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

