अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- आरोग्य उपसंचालक कार्यालयात बदली होऊनही अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर वर कायम आहे. गेल्या दोन वर्षापासून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देऊन त्यांचे स्थान पक्के केले, तर काही कर्मचारी अधिकारी यांच्या वर विद्यमान उपसंचालकांची मर्जी असल्याचे लपून राहिले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारी अधिकारी आपल्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ झाला तरी आपल्या पदावर व एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.यामुळे ते अधिकारी कर्मचारी आपल्या वरिष्ठांना अजीबात जुमानत नाहीत. एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे विविध विभागात भष्ट्राचार वाढला असून बऱ्याच कर्मचारी अधिकारी यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना बदली झालेल्या मुळ ठिकाणी पाठवा तसेच एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचारी यांची बदली करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल. अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

