पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गुलटेकडी परिसरात घातक शस्त्रे घेऊन साथीदारांसह दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पो.स्टे. CR No 61/23 IPC 307, 326, 324, 143, 247, 148, 149, आर्म ऍक्ट 4(25) क्री. अ ऍक्ट क 7, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट क 37(1) सह 135 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चेक कलम 3(1)(ii) व 3(4) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत युनिट 2 चे प्रभारी वपोनि नंदकुमार बिडवई यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली युनिट 2 कडील सपोनि वैशाली भोसले व स्टाफ याना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले. त्याअनुषंगाने सपोनि वैशाली भोसले व स्टाफ असे आरोपींचा युनिट 2 हद्दीत शोध घेत असताना, युनिट 2 कडील पो हवा उज्वल मोकाशी व उत्तम तारू याना त्यांचे बातमीदारामार्फत दाखल गुन्ह्यात अमर आयुष्य माने याचा सहभाग असून तो घटना घडतेवेळी तेथे हजर होता. व तो गिरीधर भवन चौक येथे येणार असून त्याने अंगात काळ्या पांढऱ्या रंगाचा व ग्रे रंगाची जीन्स पँट घातली आहे, अशी वर्णनासह खात्रीलायक बातमी मिळाली. सदरबाबत युनिट -2 प्रभारी नंदकुमार बिडवई याना कळविले असता, त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफ ने तात्काळ बातमी ठिकाणी धाव घेत सापळा रचून प्राप्त वर्णनावरून एका इसमास ताब्यात घेतले. त्यास स्टाफची ओळख सांगून त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आयुष्य किसन माने वय 20 रा 425 /263 मीनाताई वसाहत, गुलटेकडी पुणे असे असल्याचे समक्ष सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याअनुषंगाने चौकशी करता, तो असमंध माहिती देऊ लागला. त्यानंतर त्यास युनिट -2 कार्यालयात आणून आणखी कसून तपास करता, त्याने सदरचा गुन्हा परिसरात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली.त्यानंतर स्वारगेट पो स्टे कडे आयुष्य माने बाबत चौकशी करता तो दाखल गुन्ह्यात पाहिजे असल्याचे समजल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाहीकामी स्वारगेट पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली भोसले, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, उत्तम तारू , संजय जाधव, साधना ताम्हाणे, पुषपेंद्र चव्हाण, निखिल जाधव व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे

