हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढ होत आहे. त्यात मणिपूरच्या अत्याचाराच्या घटनेचा सर्वत्र विरोध होत असताना चंद्रपूर जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत भर चौकात मारहाण करण्यात आली. या बाबत पोलिसांनी 4 आरोपींवर विविध कलमासह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पण अद्याप पर्यंत या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आपल्याला न्याय मिळत नाही असे दिसून येत असताना पिढीत महिलाने पत्रकार परिषदेत घेऊन आपली व्यथा सांगितली. या पत्रकार परिषदेत पिढीत महिलेने सांगितले की, आठवड्याभरात आरोपीला ताब्यात न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत पिढीत महिलेने सांगितले की, आरोपी खंबाडा गावचा रहिवासी असून 31 ऑक्टोबर रोजी गावातच तिच्यावर अत्याचार झाला, तिने पोलिसांत तक्रार केली, त्याआधारे पोलिसांनी गावातीलच शेख उरफान विरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेचे म्हणणे आहे की, जेव्हापासून तिने बलात्काराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली, तेव्हापासून आरोपीचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणत आहेत आणि सहमत नसल्याबद्दल भांडत आहेत.
दरम्यान, 22 जून रोजी आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला गावातील चौकात सर्वांसमोर अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केली. फाटक्या कपड्यांसह वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार घेण्याऐवजी तेथे तैनात सहायक पोलिस निरीक्षक चवरे यांनी शिवीगाळ केली. पीडितेचे म्हणणे आहे की, वरोरा पोलिस ठाण्यातून सहकार्य न मिळाल्याने तिने थेट नागपुरात जाऊन विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली, त्यांच्या सूचनेवरून वरोरा पोलिसांनी अखेर ९ जुलै रोजी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. शेख रिजवान, शेख मौसीम, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांचा समावेश आहे.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे, आरोपी वरोरा पोलीस स्टेशनचे एपीआय चावरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.त्यामुळे ते अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. आरोपी या आरोपींपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले. आठवडाभरात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करणार असून, त्यासाठी आरोपी आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे एपीआय जबाबदार राहणार असल्याचे तिने म्हटले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

