संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात एका पोलीस स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकीने एकच खळबळ उडाली आहे. ती धमकी निनावी फोनच्या माध्यमातून देण्यात आली होती त्यामुळे नागपुर पोलीस ॲलट मोड वर आहे.
नागपुर शहरातील मध्य भागात असलेले सीताबर्डी पोलीस स्टेशन बॉम्बस्फोट होणार आहे.’ असा निनावी फोन पोलीस नियंत्रण कक्षात आला. त्यामुळे नियंत्रण कक्षाने याबाबत तातडीने सीताबर्डी पोलिसांना कळवले. ही माहिती प्राप्त होताच सीताबर्डी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच बॉम्बशोधक – नाशक पथकाला पाचारण केले. मात्र, काहीही आढळून आले नाही. कुणीतरी खोळसाळपणा केल्याचे समोर येताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. 112 या आपात्कालीन क्रमांकावर अज्ञात आरोपीने फोन करून सीताबर्डी पोलिस स्टेशन मध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली.सूचना प्राप्त होताच तातडीने बीडीडीएस पथकाला बोलविण्यात आले व काही मिनिटांतच संपूर्ण पोलिस स्टेशन रिकामे करण्यात आले. पोलिस स्टेशन मधील कर्मचारी, लॉकअपमधील आरोपी व अधिकारी सर्व बाहेर आले.
त्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने पोलिस स्टेशन तसेच आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी केली. मात्र, कुठेही स्फोटक वस्तू किंवा ज्वलनशील पदार्थ आढळले नाही. अज्ञात व्यक्तीने फोन करून खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल बेडवाल यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा फोन नेमका कुणी केला, याचा शोध घेण्यात येत असून क्रमांक ट्रेस करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

