🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतीनिधी
अहमदनगर :- शहरातून एक बातमी समोर येत आहे व्यापार्याचे बंद घर फोडून सात लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शहरातील विनायकनगर भागातील अरिहंत अपार्टमेंटमध्ये घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतीलाल गणेशराम चौधरी रा. अरिहंत अपार्टमेंट, विनायनगर, अहमदनगर) यांनी सोमवारी दि.29 दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांचे जुनी कोर्टगल्ली येथे चष्म्याचे दुकान असून, ते विनायकनगर येथील अरिहंत अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. 15 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी 7 लाख रूपयांची रोकड घरातील कपाटात ठेवली होती. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या मूळगावी ते कामानिमित्त गेले होते. 25 ऑगस्ट रोजी शांतीलाल चौधरी यांचे मेहुणे कांतीलाल चौधरी यांनी फोनवरून त्यांना कळविले की, दुकानावरून रात्री घरी आलो असता, घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. तसेच, बेडरूममधील कपाटातील ड्रॉवरचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शांतीलाल चौधरी 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी नगरमध्ये आले. त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता त्यांनी ठेवलेली सात लाखांची रोकड मिळून आली नाही. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांनी सोमवारी फिर्याद दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.