✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒️
नाशिक:- जिल्हात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. अशीच एक घटना जिल्हातील चांदवड गावातून समोर आली आहे.
वडनेरभैरव गावातील चांदवड बहादुरी रोडवरील मंजुळा कॉमल्पेक्समधील महाराष्ट्र सबमर्शिबल वर्कस मोटर दुकान बंद असताना अज्ञातांनी दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून दुकानातून इलेक्ट्रिक मोटारी, कॉपर वायडिंग वायर बंडल तसेच १००० मिटर कॉपर वायर असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. या घटनेबाबत ज्ञानेश्वर संपतराव आहेर ३६, रा. वडाळीभोई यांच्या फिर्यादीवरुन वडनेरभैरव पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आर. एस. आवारे करीत आहे.