पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- 10 ऑगस्ट 2020 रोजी पुण्यात एक विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतला आत्महत्या केली होती. त्यानंतर मृतक महिलेच्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोपातून पुरव्या अभावी मृतक महिलेचा पती अभिजित गुंडू गायकवाड, सासू, सासरे व दोन नणंदा यांची सबळ पुराव्याअभावी या प्रकरणात संशयित आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी निर्दोष मुक्तता केली.
प्राप्त माहितीनुसार, 10 ऑगस्ट 2020 रोजी 10 वाजता फिर्यादी यांच्या मुलीने राहत्या घरी पिंपळे गुरव, कशिदनगर येथे असताना, सासर कडील लोकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून, राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. सदर प्रकरण मुलीच्या वडिलांना कळताच, मुलीच्या वडिलांनी सांगवी पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी फिर्याद नोंदवून सदर प्रकरणातील संशयित आरोपी अभिजित गुंडू गायकवाड, सासू, सासरे व दोन नणंदा यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप फिर्यादी यांनी आरोपीवर लावला. आणि पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल केल्यानंतर सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली. सदर प्रकरणानंतर सांगवी पोलीस स्टेशन यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकार पक्षातर्फे साक्ष, कागदपत्रे, मुद्देमाल तपासण्यात आले असून, सबळ पुराव्याअभावी या प्रकरणात सदरील संशयित आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणात आरोपि तर्फे ॲड. अरविंद धकाते, ॲड. दिपक पाटील, ॲड. शुभम लोखंडे, ॲड. राकेश धकाते आणि ॲड. शैलेश बेरे पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात दाखल केलेले पुराव्या आणि बचाव युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

