संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका येत्या 4 सप्टेंबर रोजी होऊ घातल्या आहे. यादरम्यान छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी लागली असून गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे विद्यापीठपरिषदेत एकूण 3 उमेदवार अविरोध निवडून आले असून असून यंग टीचर संघटनेने आपल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.
गोंडवाना विद्यापीठ निवडणूक -2022 अंतर्गत सिनेट प्राचार्य गट, शिक्षक गट आणि पदवीधर गट तसेच विविध शाखेतील विद्यापरिषद प्राधिकरणाच्या निवडणुकीत गोंडवांना यंग टीचर्स सह सेक्युलर पॅनल, नूटा तसेच शिक्षण मंच या संघटनांनी स्वतंत्रपणे आपापले उमेदवार उभे केले आहे.
यंग टीचर्स संघटनेचे संस्थापक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे, संघटनेचे आधारस्तंभ डॉ. प्रदीप घोरपडे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोरलावर यांच्या नेतृत्वात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका लढविल्या जात आहे.
प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या हितासाठी अत्यंत सक्रिय असलेल्या गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे विद्या परिषदेतील तीन उमेदवार अनुक्रमे डॉ.विजय वाढई विज्ञान आणि तंत्रज्ञान ओबीसी गट, डॉ.रवींद्रनाथ केवट मान्यव विज्ञान विजेएनटी गट, डॉ.तात्याजी गेडाम कॉमर्स अँड मॅनेजमेंट अनुसूचित जमाती प्रवर्ग हे अविरोध आले आहे. गेल्या दहा वर्षापासून गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने प्राध्यापकांच्या हिताच्या संदर्भात सक्रिय होऊनअनेक प्रश्न मार्गी लावले तसेच संघटनेने संशोधन प्रकियेतील अनेक अडचणी,7 व्या वेतन आयोगाचे हप्ते,शिक्षक मानधन प्रश्न, जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा, सहसंचालक यांचे स्थायी कार्यालय तसेच शारिरीक शिक्षण आणि ग्रंथालय शास्त्र या विषयाकरिता संशोधन केंद्र अश्या व इतर अनेक मागण्या तळमळीने मांडल्या. यंग टीचर्स संघटनेला मतदारांचा वाढता पाठिंबा दिसत असून सिनेटमध्ये आणि विद्या परिषदेमध्ये तसेच पदवीधर सिनेट मतदारसंघांमध्ये प्रचारामध्ये यंग टीचर्स संघटना आघाडीवर असल्याचे चित्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश कॉलेजमध्ये दिसत आहे.