राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सामूहिक बलात्काराच्या घटनेन मुंबई हादरली आहे. येथील मानखुर्द येथे एका 7 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना समोर येताच नागरिकात संताप दिसून येते आहे.
आज महिला अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मानखुर्द येथे 7 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. यामध्ये 2 नराधमाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे.
ट्रॉम्बे पोलिस स्टेशन मध्ये सामुहिक बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाची गांभीर्य ओळखून पोलीस तडकाफडकी हरकतीत आली आली. या नराधम आरोपी अटक करून त्याच्या विरुद्ध भादवी कलम 376 (D) आणि पॉक्सो कायद्या अनव्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर दुसर्याला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.