संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- विविध मुद्द्याला घेऊन सरकारला प्रश्न विचारत विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ऑगस्ट क्रांतीदिनी विदर्भावाद्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होत. यावेळी पुरुष आणि महिला आंदोलकांनी लक्षणिय सहभाग दर्शवून जोरदार आंदोलन केले.
मागील अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्य व्हावे म्हणून आंदोलने सुरू आहे. पण हे राज्यकर्ते निवडणूक आली की, विदर्भ राज्य करतो असे तुणतुणे वाजवीत फिरत असतात एकदा निवडणुकी संपल्या की, विदर्भाचा प्रश्नावर मूंग गिळून गप्प बसले असतात. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
तसेच महागाईने जनता होरपळत असताना वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली ती विजदरात झालेली वाढ कमी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्न धान्यावरील जीएसटी विरोधात विदर्भवादी आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
विदर्भातील तरुणांच्या हाताला काम नाही. मिहान प्रकल्प आणून ठेवला पण त्यात काम नाही. विदर्भावर सतत अन्याय होत आहे. मात्र सरकार न्याय देत नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलक तरुणांनी दिली आहे.
सुरुवातील लाँगमार्च काढून आंदोलनकर्ते फडणवीसांच्या घराकडे कूच करत असताना पोलिसांनी त्यांना मध्ये अडवल्याने वातावरण तापले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांनी फडणवीस यांच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावून मोठा बंदोबस्त तैनात केला. परंतु, संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.